प्रिय विद्यार्थी शिक्षक आणि आदरणीय पालक ,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित , प्रेरणा प्राथमिक विद्यालयामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.
विद्यालयाची मुख्याध्यापिका या नात्याने शाळेचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले.आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना कौशल्य आणि सांस्कृतिक वारसा देत असतो.आमच्या शाळेमध्ये विविध सांस्कृतिक,शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आणि उत्सवाच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा रुजवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याबरोबरच विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा नावीन्यपूर्ण असे शैक्षणिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती राबवत असते.
या प्रवासाला सुरुवात करत असताना मी आमच्या शालेय विद्यार्थ्यांना व प्रत्येक सदस्याला विनंती करते की त्यांनी परंपरा नाविन्यपूर्णतेची मूल्ये आत्मसात करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून शाळेची व राष्ट्राची प्रगती आणि समृद्धी यासाठी योगदान देणारे कार्य व्हावे यासाठी आमची शाळा प्रयत्नशील असते.
आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर सोपवल्याबद्दल धन्यवाद!
मुख्याध्यापिका
सौ. वैशाली शिवाजी देशमुख