
प्रिय विद्यार्थी, शिक्षक व आदरणीय पालक,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित, प्रेरणा माध्यमिक विद्यालयांमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे .
जिथे शिक्षणासोबत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पूर्ण क्षमता साध्य करण्याची मूल्ये दिली जातात व त्यांना प्रोत्साहित केले जाते.
अशा ४० वर्ष वारसा असलेल्या विद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून मला या शाळेचे नेतृत्व करण्याचा व एका उत्कृष्ट समुदायाचा भाग असल्याचा आनंद व अभिमान आहे.
प्रेरणा माध्यमिक विद्यालयांमध्ये आमचे लक्ष शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतो. आमचा सर्व अनुभवी कर्मचारी वर्ग विद्यार्थ्याला घडवत असताना त्याच्यामध्ये सचोटी आदर आणि जबाबदारी यासारखी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच परिणाम म्हणजे आमच्या शाळेचा एस.एस.सी बोर्डाचा उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध स्पर्धांमधील पारितोषिके ही शाळेच्या विकासाची मानांकने आहेत .
शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करताना मी तुम्हाला प्रेरणा माध्यमिक विद्यालय देत असलेल्या असंख्य संधींचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करते .
चला आपण सर्वजण आपल्या भावी राष्ट्रनिर्मात्यांना त्यांच्या प्रोत्साहनामध्ये मदत करूया आणि हे उत्तम राष्ट्र घडवण्यास योगदान देऊ या.
मुख्याध्यापिका
सौ. पाटील रंजना यशवंतराव