प्रेरणा हीच शक्ती " असे मानून, डॉ. सौ. अनुराधाताई पटवर्धन मॅडम यांनी १९८४ मध्ये 'प्रेरणा वनिता मंडळ' स्थापन केले आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रथम विद्यार्थ्याला प्रवेश दिला. सौ. पटवर्धन, श्रीमती आठल्येताई आणि श्रीमती अत्रेताई यांनी त्यांच्या बंगल्याच्या प्रत्येक खोलीत वर्ग सुरू करून शाळेची सुरुवात केली. १९९६ मध्ये, प्रेरणा विद्यालयाचे वर्ग आंबेगाव पठार येथील विस्तारित आवारात स्थलांतरित झाले. प्रेरणा शाळा ही धनकवडी परिसरातील पहिली खाजगी शाळा आहे. या संस्थेचे संचालक मंडळ महिला मंडळ आहे आणि प्रेरणा बालक मंदिर, प्रेरणा प्राथमिक शाळा, प्रेरणा माध्यमिक शाळा हे तीन विभाग मंडळाद्वारे चालवले जातात. शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे प्रशस्त मैदान, संगणक कक्ष, आधुनिक प्रयोगशाळा.
प्रेरणा वनिता मंडळ संस्थेचे १ मार्च २०२५ रोजी शिक्षण क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत विलीनीकरण करण्यात आले. सदर संस्थेच्या सोबतीने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विविध शैक्षणिक उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबवले जातात.